अयोध्येतील रामनगरी उजळली; मात्र ‘ती’च्या आयुष्यात प्रकाश कधी?

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात आली. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामनगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन करुन एक नवा विक्रम रचण्यात आला होता. या दीप प्रज्वलनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसह मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते. परंतु, दीपोत्सवानंतरचा एक फोटो आता सोशल मीडियाने वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमुळे मोदी सरकारवरही विरोधी पक्षांनी जोरदार टीका सुरु केली आहे. तसेच नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

रामाचीनगरी येथे एकूण पाच लाख 51 हजार दीप प्रज्वलन केले होते. तसेच इतर दीड लाख दीप मठ आणि मंदीर येथे लावण्यात आले होते. मोदी सरकारमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास होत असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी त्यावेळी भाषणात म्हंटले होते. परंतु, याच दीपोत्सवानंतर एक चिमुकली दिव्यातील राहिलेले तेल आपल्याजवळील बाटलीत भरत होती. यावेळी काढलेला हा फोटो आता व्हायरल होत आहे.

त्या चिमुकलीचा फोटो शेअर करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले कि, हेच ते सत्य जे भाजप बघू शकत नाही. पैशांचा वापर या चिमुकलीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी खर्च केला असता तर भगवान रामाची अयोध्या आनंदाने झगमगली असती, असे त्यांनी म्हंटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)