Eckental Challenger Tennis : रामकुमारला उपविजेतेपद

बर्लिन – इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनला अंतिम फेरीत सेबेस्टियन कोर्ड कडून 6-4, 6-4 असा पराभव पत्कारावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

जर्मनीत सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने यजमान देशाच्याच मार्वीन मॅलरचा 4-6, 6-1 व 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात रामकुमारने पहिला सेट गमावल्यानंतरही जोरदार पुनरागमन करताना पुढील दोन्ही सेट जिंकत अंतिम फेरी गाठली.

विजेतेपदासाठी त्याची लढत अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डशी झाली. मात्र, या लढतीत पुन्हा एकदा रामकुमारला विजेतेपदाने हुलकावणी दिली. या स्पर्धेच्या इतिहासात रामकुमार पाचव्यांदा सहभागी झाला होता. मात्र, आजवर त्याला ही स्पर्धा जिंकण्यात एकदाही यश आलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.