आम्हाला माणसे घडवायची आहेत; मशिन्स नव्हे : डॉ. रमेश पोखरियाल

सर्वांगीण विकासासाठी शिक्षणच आवश्यक

पुणे – शिक्षण आयुष्यात माणसाला सक्षम बनवते. भारतात आपण कोविडच्या आव्हानावर मात केली आहे. आपण आव्हाने संधींमध्ये बदलली आहेत. इतर देश हे एक वर्ष मागे गेले आहेत पण आपण भारतात संकटांचा सामना केला आहे आणि कधीही, कुठेही थांबलेलो नाही, असे विधान शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केले.

सिंबायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) (एसआययू) आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज् (एआययू) यांच्या संयुक्तविद्यमाने व ओब्रेल ग्लोबल इंडिया चॅप्टर आणि द वर्ल्ड बँक यांच्या सहकार्याने उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण (आयएचई २०२१). या विषयावर पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेसाठी डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक, माननीय शिक्षणमंत्री,भारत सरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. पोखरीयाल म्हणाले, भारतात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या इतकी मोठी आहे की जगातील बर्‍याच देशांमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत देखील ती अधिक आहे. सध्याचे युग हे “डिजिटल युग” आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने आपण शिकवणे चालू ठेवले व शैक्षणिक वर्ष पूर्ण केले. आपल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ दिलेले नाही. या कठीण काळात आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० देखील तयार केले. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणच जबाबदार असते. आपल्या देशाला तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठांचा वारसा आहे. त्या काळात भारत जगात शिक्षणात अग्रणी होता. आपण नेहमीच जग एक कुटुंब असल्याचे मानले आहे – (वसुधैव कुटुंबकम).

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे डॉ. पोखरियाल यांनी नमूद केले. आता आपण केवळ प्रतिभेचा शोध घेणार नाही तर त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण देखील देणार आहोत .आपण शिक्षणाच्या सर्वांगीण क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करीत आहोत. आपण संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रात पुढे जात आहोत. आपण “स्टडी इन इंडिया” हा प्रोग्राम अभ्यास सुरू केला आहे. आपल्याकडे जगाला देण्यासाठी अनेक अनोख्या गोष्टी आहेत जसे योग, आयुर्वेद, संगीत, कला आणि साहित्य इ. आपल्या देशातील शेवटच्या व्यक्तीला देखील नव्या शैक्षणिक धोरणाचा लाभ मिळाला पाहिजे. आपण आपल्या देशात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आमंत्रित करीत आहोत.नव्या धोरणामध्ये शिक्षकांच्या शिक्षण आणि विकासावर देखील विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्हाला माणूस बनवायचे आहेत, मशीन्स नव्हे. आम्हाला आपल्याला भारताला जागतिक महासत्ता बनवायचे आहे आणि जगाला एक चांगले सुखी कुटुंब.

सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष आणि कुलपती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ डॉ. शां ब. मुजुमदार यांनी सांगितले की, आपण कोविडायझेशनला घाबरू नये. कोविड निश्चितच जाईल परंतु तोपर्यंत आपण थांबता काम नये. आपण आपल्या ध्येयाप्रती सुरु असलेली वाटचाल थांबवता काम नये. ऑनलाईन शिक्षण हा कॅम्पस शिक्षणाचा पर्याय नाही. कॅम्पस शिक्षणानेच जगाला महान व्यक्ती दिल्या आहेत. देशाला आकार हा विद्यापीठांच्या वर्गात आणि परिसरातच मिळतो. वर्गाबाहेरील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आयुष्यात आशावादी राहा आणि कोविड ला पराभूत करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.