रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या सौमिल चोपडे याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच कायम राखली.
जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या सौमिल चोपडे याने सातव्या मानांकित कर्नाटकाच्या श्री प्रणव तम्माचा 7-5, 1-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
क्वालिफायर महाराष्ट्राच्या प्रद्युम्न तोमर याने आपलाच राज्य सहकारी राघव अमीनचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 2-6, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या सहाव्या मानांकित रुरीक रजीनी व महाराष्ट्राच्या मिहीर कांतवाला यांनी अनुक्रमे महाराष्ट्राच्या चिनार देशपांडे व कर्नाटकाच्या आराध्य व्दिवेदी यांचा 6-0, 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या माही खोरे व आनंदी भुतडा, कर्नाटकच्या आदिती भट, पश्चिम बंगालच्या अग्निमित्रा भट्टाचार्या, आंध्रप्रदेशच्या साई टी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.