कमल ढोले-पाटील यांचा विश्वास : बागवे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन
पुणे – राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनादेश यात्रा काढली असली तरी, राज्यात आणि पुण्यात जनादेश भाजपच्या विरोधात असून मतदार आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहतील, असा विश्वास कमल ढोले-पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी 6 वाजता एमजी रोड येथे माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. तसेच आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आघाडीत घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित काम करत असून शहरात मोठे बदल घडतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमास कॉंग्रेस नेते मोहन जोशी, उल्हास ढोले-पाटील, विनोद मथुरावाला, मोहनसिंग राजपाल, रजनी त्रिभुवन, लताताई राजगुरू, मौलाना काझमी, अजित दरेकर, चॉंदबी नदाफ, वीरेंद्र किराड, रफिक शेख, रिपब्लिकन चेराहुल डंबाळे, हाजी नदाफ, विठ्ठल गायकवाड, गौतम महाजन, करण मकवाना, अविनाश बागवे, भोलासिंह अरोरा, मंजुर शेख, साहिल केदारी, रशीद खिजर, जोशिवा रत्नम, शिलार रतनगिरी, सुजीत यादव, विठ्ठल थोरात, इस्माईल चौधरी यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.