नवी दिल्ली : योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आएमए यांच्यात सुरु झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता तर रामदेव यांननी आएमएच्या डॉक्टरांसंदर्भात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी सनसनाटी आरोप केले. आयएमए केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात स्वामी रामदेव यांनी आयएमएवर निशाणा साधला आहे. ते मिडियाच्या एका लाइव्ह प्रोग्रॅममध्ये बोलत होते.
रामदेव बाबा पुढे म्हणाले,डॉक्टर मला देशद्रोही म्हणत असतील तर मग देशभक्त कोण आहे? ज्यांचे संबंध धर्मपरिवर्तनाशी जोडले गेलेत, ज्यांना असे वाटते की, करोना चांगला आहे कारण त्यामुळे धर्मपरिवर्तनही वाढेल ते देशभक्त आहेत का, असा सवाल त्यांनी केला. करोनासाठी औषधाची गरज नाही, धर्माची विशेष कृपा झाली की सगळं ठिक होईल. अशी अंधश्रद्धा बाळगणारे लोकच तर आयएमएचे अध्यक्ष झालेले आहेत असेही रामदेव यांनी म्हटले आहे.