नवी दिल्ली : अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना व्हायरसला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूदरम्यान घरात बसणाऱ्यांसाठी योग गुरु रामदेव बाबा यांनी एक उत्तम सल्ला दिला आहे.
आज देशभरात सकाळी ७ वाजल्यापासूल जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. हा कर्फ्यू रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या काळात तुम्ही काय करू शकता, याचा सल्ला योगगुरू रामदेव बाबांनी दिला आहे.
हम सब मिलकरके @narendramodi जी के संकल्प को पूरा करके दिखाएंगे,
भारत को #Corona से बचाएंगे.
साधना,सावधानी,संयम, संकल्प।
सभी लोग घर पर स्वाध्याय, योग,आसन,प्राणायाम,ध्यान,
सत्संग करें।
-बाहर नही,अंदर जाइये।#JantaCurfewMarch22 https://t.co/ggtYnjcIXF pic.twitter.com/vDbZmBKwwC— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) March 22, 2020
रामदेव बाबा यांनी यासंदर्भात एक टि्वट केलंय. त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प आपण सारे पूर्ण करून दाखवूया. भारताला करोनापासून वाचवूया. सर्वांनी घरी स्वाध्याय करा. योग करा. काही आसनं करा. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. याशिवाय घरी बसून सत्संगही करा. पण, बारे येऊ नका. घरातच राहा.
करोना व्हायरसने भारतातही झपाट्याने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते.