मथुरा – हत्तीवर बसून योगासन करत असताना हत्तीने हालचाल केल्याने तोल जाऊन रामदेव बाबा हत्तीवरून खाली पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मथुरेतील महावन येथील रमणरेती आश्रमातील असून तो कालचा (सोमवार, 12 ऑक्टोंबर) असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, रामदेव बाबा रमणरेती आश्रमातील संतांना योगाभ्यास शिकवत होते. यावेळी ते हत्तीवर बसून योगा करत होते. हत्तीने हालचाल केल्याने बाबांचा तोल गेला आणि ते जमीनीवर पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ 22 सेकंदाचा असून यात रामदेव बाबा योगा करताना आणि हत्तीने हालचाल केल्यानंतर खाली पडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.