आंबेगाव : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे पाळीव राजा या श्वानाने प्रसंगावधान राखत घराच्या अंगणात आलेल्या नागापासून संरक्षण करत आपल्या मालकिणीचे प्राण वाचवले आहे.
एक वेळ रक्ताची नाती संकटात आपला हात सोडतात पण प्राण्यांना लावलेला जीव आणि त्या बदल्यात त्याची मालकाप्रती असलेली निष्ठा ही संकटकाळी देखील कायम राहत असते.
याचीच प्रचिती निरगुडसर येथील माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या पत्नी चंदा वळसे पाटील यांना आली असून घराच्या अंगणात आलेला नाग पहाताच घाबरून खाली पडलेल्या चंदा यांचा राजा या श्वानाने जीव वाचवला आहे.