‘रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू’

पिंपरी – शिवाजी महाराजांनी समर्थंनाही गुरू मानले होते. हा इतिहास मान्य नाही, असे असू शकते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरू होते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

पाटील म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. गुरू म्हणजे आध्यात्मिक गुरू होते. मनुष्य मनाच्या शांतीसाठी ईश्‍वराची आराधना करीत असतो. त्यासाठी त्याला गुरू हवा असतो. तो गुरू जर चौकस असला तर तो केवळ अध्यात्मातीलच नव्हे तर राजकारणातीलही मार्गदर्शन करतो. मॉं जिजामाता या त्यांच्या गुरू होत्या हे सर्वांना माहिती आहे. त्या त्यांना शस्त्र चालवायला शिकवायच्या, राजनिती, माणस ओळखायला शिकवायच्या यात दुमत नाही. पण शिवाजी महाराजांनी समर्थांनाही गुरू मानले होते. आता हा इतिहास मान्य नाही, असे असू शकत. मात्र वर्षानुवर्ष आम्ही पुस्तकात जे शिकलो ते पुसण्याची तुमची ताकद नाही.

राज्यातील एक नेता असा आहे की ज्या ज्यावेळी त्यांना ताकद मिळते, त्यावेळी ते समाजात जातीयवाद निर्माण करतात. संभाजीराजांना आम्ही राज्यसभेवर नेल्यावर शरद पवार म्हणाले की पेशवे राजे ठरविणार, असे म्हणत जातीयवाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.