दसरा मेळाव्यापुर्वी रामदास कदम यांचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र म्हणाले…

मुंबई – दोन वर्षानंतर शिवसेनेचा यावर्षी दसरा मेळावा मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे. करोना महामारीमुळे दसरा मेळावा घेता आला नाही. मात्र आता करोनाची परिस्थिती सुधारत असल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.

दसरा मेळाव्यामुळे शिवसैकांमध्ये जल्लोश दिसून येत आहे आणि या मेळाव्याला आता आणखीच महत्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्याची चर्चा होण्याचे आणखी एक कारण असे की, शिवसेना नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याला हजर राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे.

असे असताना रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण आज दसरा मेळाव्यास हजर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पत्रात प्रकृती ठीक नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. तीन महिन्यापासून प्रकृती ठीक नाही, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याचे कदम यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्याबाबत रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर कदम वादात सापडले होते. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू देखील मांडली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.