रामदास आठवले म्हणतात…अनुराग कश्यपला अटक करा!

मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहे. तिच्या या आरोपांमुळे अनुरागवर टीका होत आहे. याप्रकरणी अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पायल घोषला न्याय मिळायला हवा यासाठीआरपीआय देशभर आंदोलन करणार आहे. तसेच याप्रकरणी पायल घोषप्रकरणी अनुराग कश्यपला अटक केली पाहिजे. अनुराग कश्यपला अटक न केल्यास ओशिवरा पोलीस स्टेशनला घेराव घालू,’ असेही रामदास आठवले म्हणाले.

सुशांत राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाप्रकरणी रामदास आठवले यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास संशयास्पद आहे, असे रामदास आठवलेंनी सांगितले. सुशांतच्या तपासाप्रमाणे त्याची मॅनेजर दिशा सालीयनची मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी, असेही आठवलेंनी म्हटलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.