सिद्धार्थ शिरोळे यांना रामदास आठवले यांनी दिल्या काव्यमय शुभेच्छा

पुणे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या आहोत पाठीशी. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी’, अशा शब्दांत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना कवितेतून शुभेच्छा दिल्या.

पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना आठवले यांच्या कवितांनी रंगत आणली.

आठवले आणि खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत शिरोळेंच्या प्रचारासाठी औंध ते खडकी बाजार या भागात मोटारसायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. या वेळी भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, चिंतन शहा, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, मुकेश गवळी, परशुराम वाडेकर, विलास पंगुडवाले, शाम काची, सुरेंद्र जी भाटी, अमित बिवाल, अमर देशपांडे, दादा कचरे, योगेश कणनायर, दत्ता सावंत, अजित पवार आदी उपस्थित होते.

“मी इथे आलो आहे सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून देण्यासाठी आणि मी इथून जात आहे तुझ्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांचा बदला घेण्यासाठी’, अशी आणखी एक चारोळी देखील त्यांनी पेश केली आणि शिरोळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

दरम्यान शिवाजीनगर परिसरात शिरोळे यांच्या प्रचारासाठी खास मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये नगरसेविका रेश्‍मा भोसले आणि शिवाजीनगरमधील कार्यकर्त्यांनी शिरोळे यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्‍वासन दिले. माजी खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक गणेश घोष, समीर धुमाळ, बाळासाहेब दारवटकर, गोपाळ देशमुख या वेळी उपस्थित होते. तर औंधमधील मेळावा नगरसेवक विजय शेवाळे, सुरेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.