नवी दिल्ली: रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून तर संजय धोत्रे यांनी दूरसंचार विभागाचे राज्यमंत्री म्हणून आज पदभार स्वीकारला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे नुकतेच खातेवाटप झाले असून महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी रामदास आठवले यांनी आज शास्त्री भवनात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले आणि मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर संजय धोत्रे यांनी दूरसंचार भवनात दूरसंचार राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.