वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली या गावाच्या विकासामध्ये रामभाऊ दाभाडे व इतर यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या पाठबळामुळेच वाघोली विकासाच्या उंबरठ्यावर आली असल्याचे गौरवोद्गार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार बोलत होते.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले की, ग्रामपंचायत पासून पुणे जिल्हा परिषदेचे पर्यंत विकास कामांसाठी रामभाऊ दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठबळामुळे वाघोलीत विकासाची गंगा आली आहे. वाघोली येथील पाण्याच्या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा ग्रामपंचायतीचा वाटा माफ करण्यासाठी रामभाऊ दाभाडे व इतर यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने सदर रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफ करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत . वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांना सामाजिक बांधिलकीचे हेतूने अन्नधान्य किटचे वाटप करून रामभाऊ दाभाडे यांनी सामाजिक जाणीवेचा आदर्श उभा केला असल्याचे देखील पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गोर गरीब गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. वाघोली मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव पाहावयास मिळाला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. चंद्रकांत कोलते,हवेली पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील (गवळी), वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, वाघोली चे माजी सरपंच शिवदास उबाळे,वाघोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समीर भाडळे, वाघोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप सातव पाटील, वाघोलीचे माजी उपसरपंच मारुती गाडे, वाघोलीचे माजी उपसरपंच कैलास सातव पाटील,वाघोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, वाघोलीचे वार्ड क्रमांक पाच चे प्रतिनिधी सुनील जाधवराव, सागर गोरे,सुनील काळे, वाघोलीचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद भाडळे, चैतन्य रोकडे सातव, किसन (महाराज)जाधव,बाळासाहेब शिंदे, विठ्ठल शिवरकर, वाघोली चे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके,बाळासाहेब सातव, संतोष सातव पाटील,संतोष तांबे,राजू काटे, सोपान गोरे,राहुल दाभाडे,प्रवीण दाभाडे, ज्ञानेश्वर चौधरी, बाळासाहेब कोलते, विनायक दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.