वाघोलीत रस्त्यांच्या कामांसाठी भाजपची स्टंटबाजी रामभाऊ दाभाडे यांचा आरोप

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे वाघोलीच्या वाघोली केसनंद रस्त्याचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले होते. तात्कालिक अडचणींमुळे या कामाला सुरुवात होण्यास उशीर झाला. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा सुरु देखील होता मात्र भाजपच्या वतीने या रस्त्यावर कामात दिरंगाई होत आहे. काम वेळेवर होत नाही अशा प्रकारची कारणे दाखवत आंदोलन करण्यात आले.

भाजप जाणीपूर्वक रस्त्याची मंजुरी तसेच रस्त्याच्या कामाला मंजुरी आदेश प्राप्त  असताना देखील आंदोलन करून स्टंटबाजी करत असल्याचा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केला आहे.

याबाबत दाभाडे यांनी सांगितले की पावसामुळे तसेच तात्कालिक काही अडचणीमुळे कामाला उशीर झाला आहे. मात्र शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या आदेशाने ठेकेदाराला रात्री-अपरात्री देखील काम करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी व खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना केलेल्या असताना देखील भाजप जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर आंदोलनाचा इशारा  देऊन तसेच आंदोलन करून रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळे  काम करू लागले आहे.  हंगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा सर्व प्रकार सुरू असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम भाजपकडून केले जात असून यात कोणतेही राजकारण केले जात नाही. – प्रदीप सातव पाटील, उपाध्यक्ष, हवेली तालुका भाजप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.