रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दूरदर्शनवरील जुनी लोकप्रिय मालिका रामायण आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रामायण ही मालिका स्टार भारत या चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता पाहू शकाल. स्टार भारत चॅनलने ट्‌विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

राज्यात पुन्हा एकदा करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृश नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रामायण पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मागील वर्षी करोना आणि लॉकडाऊन दरम्यान टीव्हीवर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते.

अनेक वर्षांनी पुन्हा प्रसारित झालेल्या या मालिकेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच टीआरपीचा विक्रम नोंदवला गेला. रामायण पुन्हा प्रसारित झाल्यानंतर अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया पुन्हा एकदा चर्चेत आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.