रामलिंग महाराजांच्या पालखीस सुरुवात ः जुने शिरूर येथे आज यात्रा
शिरूर – हरहर महादेव…रामलिंग महाराज की जय…हरी नामाचा जयघोष…तर ढोलाच्या ताशा, डफडेच्या दणक्यात …तर सुमधुर ब्रासबॅडच्या संगीतात…तर महाआरती, सनई चौघडाच्या साक्षीने आज शिरूर शहरात शिरूरचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराजांच्या पालखीस सुरवात झाली व तीन दिवस चालणाऱ्या रामलिंग यात्रेला आजपासून सुरुवात झाली.
शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी जुने शिरूर येथील मंदिरात यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेच्या पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशिला असतो. शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरात शिरूरचे आमदार अशोक पवार, रामलिंग देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष तथा उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, शिरूरचे तहसीलदार लैला शेख, रामलिंग देवस्थान ट्रस्ट विश्वस्त यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.
प्रथेप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी पालखीस पुष्पहार घालून केले. यावेळी रामलिंग देवस्थान यांच्या वतीने मानाचा फेटा नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांना बांधण्यात आला. तसेच देवस्थान विश्वस्त यांना नगरपरिषद यांचे वतीने फेटा बांधण्यात आला.
विश्वस्त पोपट दसगुडे, तुळशीराम परदेशी, रामलिंग देवस्थानचे विश्वस्त गोदाजी घावटे, वाल्मीकराव कुरुंदळे, रावसाहेब घावटे, बलदेवसिंग परदेशी, पोपट दसगुडे, कारभारी झंझाड, जगन्नाथ पाचर्णे, नामदेव घावटे, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे सचिव मनसुख गुगळे, बबनराव कर्डिले, श्रीनिवास परदेशी, दादा पाटील घावटे, अरुण घावटे, रामलिंगचे सरपंच नामदेव जाधव, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, माऊली घावटे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य जगदाळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडीवाल, अभिजीत पाचरणे, विठ्ठल पवार, शिरूर शहर पंचक्रोशीतील रामलिंग भक्त व नागरिक उपस्थित होते.