त्यागमूर्ती : माता रमाई

असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती.

7 फेब्रुवारी 1818 मध्ये वंदनगाव येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. खेळण्या-बागडण्याच्या वयातच आई-वडिलांचे छप्पर हरपले. त्यामुळे रमाच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात झाला.

त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्याने वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला. रमाईचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले. ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस-रात्र एक करून लढत होते. त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब परदेशी असताना अनेक अडचणींचा रमाबाईंना तोंड द्यावे लागले. परंतु एका त्यागमूर्ती प्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखाची कसलीच झळ पोहचू दिली नाही. 28 वर्ष रामाईने बाबासाहेबांना साथ दिली.

बाबासाहेबांना परदेशी जावे लागल्यामुळे बाबासाहेबांनी रमाबाईंना आपल्या मित्राकडे म्हणजेच धारवाडच्या वराळे यांच्याकडे पाठविले. वराळे काका धारवड येथे मुलांचे वस्तीगृह चालवत तिथे अनेक लहान मुले खेळण्यासाठी येत त्यावेळी दोन-तीन दिवस लहान मुले खेळायला न आल्याने रमाबाई ने वरळी काकांकडे चौकशी केली असता ती मुले दोन-तीन दिवसांपासून उपाशी असून वस्तीगृहाला महिन्याला मिळणारे अन्नधान्याची अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

अनुदान मिळण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील असे जेव्हा वराळे काकांनी रमाबाईंना सांगितले. त्यावेळी त्यांचे मन भरून आले आणि त्या खोलीत जाऊन रडू लागल्या त्यांनी घाटातला सोन ठेवलेल्या डब्बा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना देऊन त्या ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवून मुलांसाठी अन्नाची व्यवस्था करण्यास सांगितले. रमाबाईच्या आदेशाचे पालन करून त्यांनी देखील लहान मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली त्यावेळी मुलांना पोटभर जेवतांना पाहून रमाबाईचे मन प्रसन्न झाले आणि तेव्हापासून रमाबाई सर्वजण त्यांना रमाई म्हणून बोलू लागले.

भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी ,
बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी.
धन्य रमाई | धन्य रमाई ||

कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व आपल्या पत्नीमध्ये मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्यचं. बाबासाहेबांचे सुद्धा रमाबाईवर निस्सीम प्रेम होते. त्यांच्यातील प्रेम, आदर आणि सामंजस्य म्हणजे एक आदर्शचं.

रमाईचे शरीर काबाडकष्ट करून थकले होते. त्यातच त्यांचा आजार डोके वर काढून उभा होता. अनेक उपचार केले. परंतु आजार विकोपाला गेला आणि 27 मे 1935 मध्ये रमाबाईचे आजारपणामुळे दुःखद निधन झाले. त्यावेळी मात्र बाबासाहेब ढसाढसा रडले.

अशा या त्यागमुर्तीला विनम्र अभिवादन.

– पियुषा अवचर

Leave A Reply

Your email address will not be published.