फलटण – श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारुन सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले.
श्रीराम कारखान्याची निवडणूक जाहीर होताच अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र, तीन मतदारसंघात उमेदवार न मिळाल्याने पहिल्या टप्प्यात श्रीराम पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी श्रीराम पॅनलचे आणखी 12 उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
जिंती- राजाळे व गुणवरे- निंबळक या दोन मतदारसंघातील प्रत्येकी तीन जागांसाठी नऊ उमेदवार आखाड्यात उतरले. त्यापैकी जिंती- राजाळे मतदार संघातील तीन जागांसाठी सत्ताधारी श्रीराम पॅनेलचे उमेदवार पोपट गणपत जाधव, सुखदेव महादेव बेलदार, शरद विश्वासराव रणवरे हे प्रत्येकी सात हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघातील एकमेव विरोधी उमेदवार विनायक तुकाराम शिंदे यांना 804 मते मिळाली.
गुणवरे- निंबळक मतदारसंघातील तीन जागांसाठी श्रीराम पॅनेलचे उमेदवार संतोष गजानन खटके, विठ्ठल दादा गौड, दत्तात्रय शंकर शिंदे हे प्रत्येकी सुमारे सात हजार मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघातील बजरंग दिलीप गावडे व रमेश तुकाराम गावडे यांना अनुक्रमे 772 व 653 मते मिळाली.
नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे आहेत. नितीन शाहूराज भोसले, शिवराज संपतराव कदम, यशवंत माधवराव सुर्यवंशी, पोपट गणपत जाधव, सुखदेव महादेव बेलदार, शरद विश्वासराव रणवरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, हणमंत नारायण अभंग, उत्तम दिनकर चौधरी, संतोष गजानन खटके, दत्तात्रय शंकर शिंदे, विठ्ठल दादा गौंड, नितीन विष्णू शिंदे, स्वामिनाथ सदन साबळे, महादेव साहेबराव माने, चंद्रकांत दत्ताजीराव पवार, अशोक दगडू सोनवणे, द्रौपदा दादासाहेब नरुटे, आशा तानाजी गावडे, डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे, मारुती रामू सांगळे. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, व्हाइस चेअरमन महादेवराव चव्हाण, माजी चेअरमन महादेवराव पवार, मानसिंगराव चौधरी, पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. खरात, फलटणच्या नगराध्यक्षा नीताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. जिल्हा निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे व एन. के. रुपनवर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.