नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा पुनरूच्चार करण्यात आला.
राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणारआहेत. तसेच सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करूनच राम मंदिराचे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही भाजपने दिली.
Union Home Minister Rajnath Singh at BJP's election manifesto release: As far as Ram Mandir is concerned, we reiterate the promise made in the last elections. We will weigh all our option & we will try that the Ram Mandir be built as soon as possible in a harmonious environment. pic.twitter.com/xofbN7500K
— ANI (@ANI) April 8, 2019
दरम्यान, भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास ७५०० सूचना पेट्या, ३०० रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.