मुंबई – करोना विषाणुची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य शासनाकडून धार्मिक सणांना बंदी घातली आहे. यावरून राज्यात मनसे व भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र मनसे व भाजपकडून दहीहंडी साजरी करण्याचा ईशारा देत दहीहंडी फोडण्यात आली आहे.
आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्या मध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्या संदर्भात निघत आहोत मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी #दहीहंडी होणारच
— Ram Kadam (@ramkadam) August 31, 2021
करोनाच्या पार्श्वभीवर गर्दी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र हे आदेश न मानता मनसेने दहीहंदी फोडल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी देखील दहीहंडी फोडणार असल्याचा ईशारा दिला आहे. मात्र ही दहीहंडी घाटकोपर पोलिस ठाण्यात फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिस स्टेशनक़डे निघत असताना आम्हाला पोलिसांनी घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. मात्र आम्ही दहीहंडी फोडणारच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राम कदम म्हणाले की, आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्या मध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्या संदर्भात निघत आहोत मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी #दहीहंडी होणारच असा इशारा त्यांनी दिला आहे.