मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली आहे. त्यानंतर राम कदम यांनी चंद्रकांत पाटलांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटलांचे वर्तन म्हणजे आयत्या बिळावर नागोबा – जयंत पाटील
तसेच राम कदम यांनी शरद पवार यांना सुध्दा टोला लगावला आहे. राम कदम म्हणतात, चंद्रकांत पाटील यांचे विधान जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की,चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही.
चंद्रकांतदादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.@Jayant_R_Patil जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की,@ChDadaPatil महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 15, 2021
पुढे राम कदम म्हणतात, त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वयावर वक्तव्य केलं. मात्र तरीही ते कोरोना काळात राज्यभरात लोकांच्या सेवेसाठी फिरत होते आणि तुमचे मंत्री एसीमध्ये बसून सरकार चालवत होते,हे जनता विसरलेली नाही.