राम गोपाळ यादव यांनी देशाची माफी मागावी – योगी आदित्यनाथ

लखनऊ – समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाळ यादव यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देत, अतिशय खालच्या पातळीवर येऊन राजकारण केल्याचा आरोप केला आहे. राम गोपाळ यादव यांच्या जम्मू-स्थित पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याचा विरोध करत, हे वक्तव्य घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करत असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हंटले आहे. मतांसाठी पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता आणि पुलवामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप आर. जी. यादव यांनी केला होता. राम गोपाळ यादव यांच्या या वक्तव्यावर बोलत योगी आदित्यनाथ यांनी राम गोपाळ यादव यांना सीआरपीएफ जवानांच्या शहिदांवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल कमी केल्याबद्दल, देशाची माफी मागावी असे म्हंटले आहे.

 

https://twitter.com/ANINewsUP/status/1108684285752426496

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)