Ram Charan | दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तो अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा लखनऊमध्ये पार पडला. यावेळी राम चरण अनवाणी पायाने पोहोचलो होता. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राम चरण एअरपोर्टवर काळ्या कपड्यांमध्ये स्पॉट झाला. तो गाडीतून उतरताना त्याच्या पायात चप्पल किंवा बूट काहीच नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या अनवाणी जाण्यामागचे कारण असे की, दक्षिणेत अयप्पा दीक्षा नावाची परंपरा आहे. यात ४१ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचे असते. यात अनवाणी चालावे लागते आणि दरवर्षी राम चरण हे करतो.
याआधीही राम चरण काळ्या रंगाच्या कपड्यात अनावणी पायाने दिसला आहे. २०२३ मध्ये जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण भारतातून रवाना झाला होता. तेव्हा देखील राम अशा लूकमध्ये पाहायला मिळाला होता.
राम चरणच्या आगामी बहुचर्चित चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, पुढच्या वर्षी ‘गेम चेंजर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १० जानेवारी २०२५ला ‘गेम चेंजर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राम चरण एक आयएएस अधिकारी राम मदनच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
या चित्रपटात राम चरणची दुहेरी भूमिका असणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. असेच काहीसे या टीझरमध्येही पाहायला मिळत आहे. वास्तविक, त्याची पहिली भूमिका वडिलांची आहे आणि दुसरी भूमिका मुलाची आहे. त्यांचे एक पात्र आयएएस अधिकाऱ्याचे आहे आणि दुसरे राजकारणी आहे. टीझरमध्ये राम चरण देखील ॲक्शन अवतारात दिसत आहे.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : पवारांमुळे जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम