पाकिस्तानमध्ये तालिबान समर्थनार्थ रॅली

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये तालिबान समर्थनार्थ एक रॅली काढली गेली होती. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ही रॅली काढली गेली होती.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या रॅलीमध्ये जैश-ए-महंम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे सदस्य सहभागी झाल्याचे स्पष्ट दिसत आहेत. या रॅलीतील काहीजण आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार देखील करताना दिसत आहेत. रॅलीच्या अखेरीस काही नेत्यांनी रॅलीला संबोधित देखील केले.
काही पत्रकारांनी तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर आणि इस्लामिक बरादर आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना फैझ हमिद एकत्र नमाज पढतानाचे फोटोही इंटरनेटवर पोस्ट केले आहेत. यामुळे तालिबानला समर्थन न देण्याचा पाकिस्तानचा दावा किती फोल आहे, हे उघड झाले.
अमेरिकेने सैन्य माघारी घेण्यापूर्वीच अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबानचे समर्थन करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान पहिला देश होता. “तालिबानी हे काही वाईट लोक नाहीत. इस्लामच्या तत्त्वांच्या आधारे अफगाणिस्तानवर राज्य करणारे ते लोक आहेत.’
अशी वादग्रस्त वक्तव्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य मंत्र्यांनी केली होती. अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेण्यासाठी पाकिस्ताननेच तालिबानला सहकार्य केले असल्याचा आरोप पाकमधील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांनीही केला आहे.




