मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंग’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते.
दरम्यान, नुकताच रकुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी तिला प्रश्न सुद्धा केले आहे. भारतात लॉकडाऊन असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. सगळे उद्योगधंदे बंद असल्याने सरकारला मिळत असलेले टॅक्स देखील बंद झालेले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने दारूची दुकानं सुरू करण्याचा नुकताच निर्णय घेतला. पण दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर तळीरामांनी वाईन शॉपजवळ गर्दी केली.
अश्याच एका दुकान बाहेरील रकुलप्रीत सिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिच्या हातात काही वस्तू दिसत आहेत. रकुलने मास्क घातला असून ती या दुकानातून काही सामान घेत बाहेर येत आहे आणि रस्ता ओलांडताना दिसत आहे.
Oh wow ! I wasn’t aware that medical stores were selling alcohol 🤔😂😂 https://t.co/3PLYDvtKr0
— Rakul Singh (@Rakulpreet) May 7, 2020
पण या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी तिला प्रश्न केले की, ती नेमकं काय खरेदी करत आहे. काहींनी तर असंही म्हटलं की, ती दारू तर विकत घेत नाहीये ना. दरम्यान, सोशल मीडियावरील ही चर्चा पाहिल्यानंतर रकुलनेच ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे.
रकुल म्हणाली की, ‘ओह वावो… मला माहितीच नव्हतं की मेडिकल स्टोर्समध्ये दारूही विकली जात आहे’. सध्या तिच्या सडेतोड उत्तराचं जोरदार कौतुक होत आहे.