मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुल प्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर, 2009 प्रदर्शित झालेल्या “गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत आपले खरे पाऊल टाकले.
रकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते. तिचे फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात असतात. असं असलं तरी रकूलला अनेकवेळा oops मोमेंट्सचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा तिला याच कारणामुळे ट्रोल केले जात आहे. कारण पुन्हा ती oops मोमेंट्सची बळी ठरली आहे.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे…’ या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान हा किस्सा घडला होता. यावेळी पिंक कलर शॉर्टस्कर्टमध्ये रकुलने हजेरी लावली होती. यावेळी खुर्चीवर बसताच तिच्या स्कर्टमुळे खुल्या पायांचे प्रदर्शन होत होते. हा स्कर्ट इतका शॉर्ट होता की, तिला बसणेही कदाचित अवघड जात असावे. यावेळी तिची चांगलीच फजिती झाली.
रकुलचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या ड्रेसमुळे तिच्यावर टीका केली आहे. तर शॉर्ट स्कर्टमध्ये कसे बसावे याच्या टीप्ससुद्धा तिचे चाहते देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी कमेंटचा भडीमार केला असल्याचे पाहायला मिळत आहे.