रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात असून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रकुलने तिच्या करिअरची सुरुवात कन्नड आणि तेलुगू चित्रपटातून केली होती. यारियां चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. आता अलीकडे रकुलला तिच्या एका वक्तव्यामुळे खूप ट्रोल केले जात आहे.
अभिनेत्रीने एका जुन्या मुलाखतीत तिच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या होत्या आणि तिच्या वडिलांनी तिला फटाके फोडण्यापासून कसे रोखले होते ते सांगितले होते. आता रकुलचे हे वक्तव्य पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे एका जुन्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “ही एक अविस्मरणीय दिवाळी होती. माझ्या वडिलांनी मला 500 रुपयांची नोट दिली आणि ती जाळायला सांगितली. मला धक्काच बसला आणि त्यांनी मला असे का करण्यास सांगितले.”
आपल्या वडिलांचे शब्द आठवून अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी मला सांगितले की तू नेमके हेच करत आहेस. तुम्ही फटाके विकत घेऊन फोडता. पैसे वापरून काही चॉकलेट्स विकत घेऊन गरजूंना दिली तर? फटाके विकत घेऊन ते फोडणे म्हणजे पैशाची किंमत नसणे हे तिला समाजवले मात्र यावरून आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने लिहिले की, तुम्ही महागडे कपडे का घालता आणि गरजूंना दान का करत नाही? असा प्रश्नही विचारला आहे वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रकुल शेवटची ‘इंडियन 2’ मध्ये दिसली होती. ही अभिनेत्री आता अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे 2’मध्ये दिसणार आहे. रकुलला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
====