राक्षेवाडी करोनामुक्त; कंटेन्मेंट झोन काढला

राजगुरुनगर  (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 61 व्यक्तींना म्हाडाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब शनिवारी (दि. 31) तपासणीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. तर राक्षेवाडी येथील रुग्ण बरे झाल्याने कंटेन्मेंट झोन काढण्यात आला आहे.

खेड तालुक्यात आतापर्यंत 22 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून दोन दिवसांपूर्वी वाजवणे, वेताळे, वाशेरे आणि बुरसेवाडीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते त्यांच्या संपर्कातील हे 61 व्यक्ती आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना केली जाणार आहे. दरम्यान, करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या 12 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.