झाडांना राख्या बांधून बोट्यात रक्षाबंधन साजरे

संगमनेर – रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. सध्य स्थितीत पर्यावरणाचा असमतोल बघता वृक्षाचे रक्षण करण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वह्यांचे पुठ्ठे, टिकल्या, थर्माकोल, लग्नपत्रिका, रंगीत कागद, जुन्या साड्यांची लेस, घरातील निकामी शोभेच्या वस्तू अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक राख्या तयार करून झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

झाडे आपले मित्र असतात, ते वातावरण शुद्ध ठेवतात आणि निसर्गचक्र सुरळीत राहण्यासाठी त्यांची मदत होते. आज विद्यार्थांनी शाळेतील आवारातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षण किती गरजेचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वंत्र निसर्गाची हानी सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, म्हणून नाथाबाबा विद्यालयाने हा अनोखा उपक्रम राबविल्याचे शंकर पानसरे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाला प्राचार्य अशोक काकदे, पर्यवेक्षक महेंद्र जठार, गणेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. शेकडो वर्षांपासून ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता हे वृक्ष मोठ्या बंधूप्रमाणे आम्हा विद्यार्थ्यांना सावली, स्वच्छ हवा, समृद्ध पर्यावरण व हजारो पक्षांना निवारा देत आहेत. आज वृक्षरुपी भाऊरायाचे रक्षण करणे आम्ही आमचे कर्तव्य आहे, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)