#रक्षाबंधन : गौतम गंभीरने समाजासमोर ठेवला ‘हा’ आदर्श

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटमध्ये २००७ सालच्या टी-20 विश्चचषक आणि २०११ सालच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारा गौतम गंभीर हा आता मैदानाबाहेरील कामामुळे आपल्या चाहत्यामध्ये लोकप्रिय आहे. गौतम हा त्यांच्या गौतम गंभीर फाउंडेशन या सामाजिक संस्थेव्दारे सामाजिक कार्य करत आहे. भारतीय सैनिकांनाही पुढे येऊन मदत करण्यात तो अग्रभागी आहे.

गौतम गंभीर याने आज रक्षाबंधन सणाच्या दिवशी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्याने रक्षाबंधनानिमित्त दोन तृतीयपंथीना आपल्या बहिणी बनवून त्यांच्याकडून राखी बांधली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भातील फोटो आणि माहिती त्याने त्याच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केली आहे. त्याने अबीना अहर आणि सिमरन शेख नावाच्या तृतीयपंथीना आपली बहिण बनवत एक प्रोत्साहक पोस्ट लिहली आहे. त्याने लिहलं आहे की, ‘स्त्री किंवा पुरूष असणं याला अर्थ नाही, माणूस असणं याला जास्त महत्व आहे’.

गौतम गंभीरच्या या ट्विटला त्याच्या चाहत्याकडून चांगलीच पंसती मिळत असून त्याचे कौतुक देखील होत आहे. गौतम गंभीर याला छोटी बहिण आहे. जिचे नाव एकता आहे.ती त्याच्यापेक्षा दोन वर्षानी लहान आहे. गौतम त्याच्या बहिणीला चांगली मैत्रिण मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)