#रक्षाबंधन: सुषमा स्वराज यांनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंना बांधली राखी

नवी दिल्ली – आज देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. बहिणीने भावाला राखी बांधून सदैव रक्षण करण्याचे वचन घेण्याचा सण. तसेच आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करत बहिणी भावांना राखी बांधतात. हा सण भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि भारताचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील साजरा केला.

रक्षाबंधनानिमित्त परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या घरी जाऊन राखी बांधली. याबाबतची माहिती वैंकय्या नायडू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. वैंकय्या नायडूंनी म्हटले आहे की, आज रक्षाबंधन सणानिमित्त परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी माझ्या निवासस्थानी येऊन मला राखी बांधली. यामुळे मला खूप प्रसन्न वाटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी वैंकय्या नायडूं यांची पत्नी उषा नायडू आणि सुषमा स्वराज यांनी या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/VPSecretariat/status/1033622317526437888

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)