बॉलिवूडमध्ये केवळ बोल्ड भूमिकेसाठी ओळखली जाणारी राखी सावंत आता सोज्वळ भूमिकेच्या शोधात आहे त्यातही तिला आता आईची भूमिका साकारायची आहे. पण प्रेक्षक राखीला आईच्या भूमिकेत स्वीकारणार का, हाही प्रश्न आहेच. यामुळे राखी पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.
एका मुलाखतीत राखी म्हणते, “मला पुढील फिल्ममध्ये तैमूरच्या आईची भूमिका करायला फार आवडेल. मला आता स्टारकिड्सच्या आईची भूमिका साकारायची. तैमूर खूप क्यूट आहे. तो सुपरस्टार होईल. तैमूर मोठा झाल्यावर मला त्याच्या आईची भूमिका करायची आहे.
भविष्यात माझी भूमिका कोणी साकारली तर ती इतकी कठीण नाहीये. कारण मी एक स्ट्रगलिंग अभिनेत्री आहे. विद्या बालन, आलिया भट्ट, करिना कपूर खान, प्रियांका चोप्रा या अभिनेत्री माझी भूमिका साकारू शकतात. या अभिनेत्री खूप टॅलेंटेड आहेत.
राखीच्या या उत्तरानंतर तिला खूप ट्रोल केले जात आहे. सध्या ‘ड्रीम मे एंट्की हिट हो गया” हे राखीचे गाणे हिट होत आहे. तिच्या या गाण्यावर तरुणाई थिरकते आहे. मात्र अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानामुळेच राखी जास्त चर्चेत असते.