राखी सावंतचे गुपचूप लग्न?

ड्रामा क्‍वीन राखी सावंतबाबत काहीही सांगितले, तरी लोकांना ती बातमी खरी वाटू शकते. राखी सावंतने 28 जुलैला मुंबईतल्या जे.डब्लू मेरियटमध्ये एका एनआरआयबरोबर गुपचूप लग्न केल्याची बातमीही अशीच पसरली होती. राखीला हे लग्न अगदी गुपचूप आणि घाईघाईने उरकायचे होते. म्हणूनच हॉटेल्च्या हॉलऐवजी रूममध्येच लग्नसमारंभ उरकण्यात आला, असेही समजले होते. अनेकांना ही बातमी खरी वाटली. त्याचे कारणही तसेच आहे. नव्या नवरीच्या वेशभुषेमध्ये राखी सावंतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामागील रहस्य लवकरच उजेडात आले.

एका ज्वेलरी ब्रॅन्डसाठी राखीने हा मेक अप केला होता. तिचा मेक अप असिस्टंट गुरप्रीत घुराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा हा लुक शेअर केला होता. त्यावर “सेलेब ब्राईड’ असेही लिहीले होते. त्यामुळेच राखीचे शुभमंगल झाले अशी अफवा पसरली होती. स्वतः राखी सावंतने एका दैनिकाला फोन करून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. हा लुक आणि मेक अप एका कॅलेन्डरवरच्या फोटोसेशनसाठी होता, असेही राखीने स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

bridel shooting

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिच्या लग्नाबाबत अनेकांन खूप उत्सुकता आहे. पुढच्यावर्षी म्हणजे 2020 साली आपण नक्की लग्न करणार, असे राखीने म्हटले आहे. आपल्या स्वतःच्या लग्नाबाबतही तिने फार्स केला होता. 2009 साली तिने स्वतःचे स्वयंवर घोषित केले होते. हा रिऍलिटी शो म्हणजे पब्लिसिटी स्टंट होता, हे काही दिवसातच स्पष्ट झाले होते.

त्यानंतर 2018 च्या डिसेंबर मध्ये तिने दीपक कलाल नावाच्या एका उद्योजकाबरोबर पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आपल्या लग्नाचे नियोजन कसे असेल, हे देखील तिने घोषित केले होते. मात्र दोघांचा विवाह काही झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)