राखी सावंतचा खोटारडेपणा उघड

राखी सावंतला ड्रामेबाज का म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोशल मिडीयावरून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी राखी वाट्टेल ते दावे, करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने “करवा चौथ’चा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. मात्र या व्हिडीओमध्ये ती खोटे बोलत होती, हे उघड झाले आहे. या व्हिडीओबाबत लोकांनी तिच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला, तेंव्हा राखीने हा व्हिडीओच डिलीट करून टाकला. या व्हिडीओमध्ये आपण गाजराच हलवा बनवणार असल्याचे राखी म्हणाली होती. तसेच ती तिच्या पतीदेवासह भारतात नाही, तर युकेमध्ये आहे.

इथेच गाजराचा हलवा बनवण्यासाठी खूप बदाम आणि अन्य ड्रायफ्रूट ऑनलाईन ऑर्डर केले आहेत, असेही ती म्हणाली होती. मात्र ती युकेमध्ये नक्की कोठे आहे. नवऱ्याचे नाव काय. करवा चौथ कहीपासून साजरी करायला लागली. या दिवसाचे महत्व माहिती आहे का, वगैरे वगैरे प्रश्‍न जेंव्हा पब्लिकने तिला विचारायला सुरुवात केली, तेंव्हा तिची भंबेरी उडाली आणि तिने चक्क व्हिडीओ डिलीट करून टाकला. राखी स्वस्तातली लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.