राखी सावंतचा कंगनाला सल्ला

ड्रामा क्‍वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या करोनाच्या साथीच्या काळात बाहेर पडलेली राखी सावंत एका वेगळ्याच अंदाजात वावरते आहे. तिने चक्क कंगना राणावतला उद्देशून एक सल्ला दिला आहे. सध्या करोनाच्या काळात लोकांना ऑक्‍सिजन उपलब्ध होत नाही आहेत.

कंगनाने लोकांना ऑक्‍सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असे राखीने म्हटले आहे. राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने एकावेळी दोन-दोन मास्क घातलेले आहेत. कारमधून उतरताना ती हातातला सॅनिटायजर सर्वत्र फवारतानाही दिसते आहे. तेव्हाच एकजण तिला ऑक्‍सिजन उपलब्ध नसल्याचे सांगतो. त्यावर राखी म्हणते “कंगनाकडे करोडो रुपये आहेत. तिने ऑक्‍सिजन खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये हे पैसे वाटले पाहिजेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

आम्हीदेखील असेच तर करत आहोत.’ राखीच्या या व्हिडिओवर अद्याप कंगनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जर कंगनाने तिच्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली तर राखीला ती पेलवणार नाही. कंगना आणि राखी यांच्यातील कॅट फाईट आता लवकरच सुरू होईल अशी शक्‍यता दिसायला लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.