बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा सोशल माध्यमामध्ये चर्चेत आहे. राखीने तिच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासोबत पोज देताना दिसतेय. या फोटोमुळे सोशल मीडिया युजर्स चांगलेच भडकल्याचे दिसून येते. युजर्सचा संताप पाहून आपले काही तरी चुकलेय, हे लगेच राखीच्या लक्षात आले आणि तिने यावर खुलासा केला.
View this post on Instagram
हा फोटो आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे तिने सांगितले. तसेच ‘मला माझा भारत देश खूप आवडतो. पण हा माझ्या ‘धारा 370’ या चित्रपटातील एक सीन आहे, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. या चित्रपटाचे नाव ‘धारा 370’ आहे. काश्मीरी पंडितांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारते आहे. माझा कॉस्च्युम तुम्ही बघू शकता. मी यात अतिरेकी संघटनांचा पर्दाफाश करणार आहे.’