कंगना वादात राखी सावंतची उडी; म्हणाली, ‘कंगनाची बाजू घेणाऱ्या पक्षाने…’

मुंबई – अभिनेत्री कंगना रणावतचा इतका पुळका येत असेल तर तीची बाजू घेत असलेल्या पक्षाने तीला निवडणूकीला उभे करावे म्हणजे खरे काय व खोटे काय सगळ्यांसमोर येइल, अशा शब्दात अभिनेत्री व डान्सक्विन राखी सावंत हीने कोणत्याही पक्षाचे नाव न घेता टोला लगावला आहे. तीच्या टीकेचा रोख भारतीय जनता पक्षाकडे असल्याचेही दिसत असले तरी तीने कोणाचे नाव घेतलेले नाही.

सातत्याने वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारी राखी सावंत आता कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेवत एका पक्षावर टीका करत आहे. कंगनावर टीका केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, जया बच्चन यांच्यावरही कंगनाने टीका केली होती. राखीने या दोन्ही अभिनेत्रींचे समर्थन करताना कंगनावरच ताशेरे ओढले आहेत.

राखीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत कंगनाबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचेही स्पष्ट होत आहे. जर कंगनाला मुंबई पाकव्याप्त कश्‍मिरसारखी वाटत आहे तर ती मुंबईत आली कशाला, जे कंगनाला आज पाठिंबा देत आहेत त्यांना लवकरच खरे काय ते समजेल.

तिला ज्यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीला सहकार्य केले त्यांच्याशीही ती अत्यंत असभ्यपणे वागली आहे. तर आज जे राजकीय पक्ष तीची बाजू घेत आहेत त्यांनाही ती सोडणार नाही. मात्र, तरीही तीचा इतका पुळका कोणाला येत असेल तर त्यांनी तीला तिकिट देऊन निवडणूकीला उभे करावे म्हणजे सत्य कळेल, अशी पोस्ट राखीने केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.