लोक मरत आहेत आणि आयपीएल काय खेळताय?

राखी सावंत भडकली

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशामध्ये सुरू असलेल्या आयपीएलवर राखी भडकली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या आणि यादरम्यान सुरू असलेले आयपीएलचे सामने यावर राखीने चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईमध्ये लाॅकडाऊन आहे मग आयपीएलचे सामने कसे सुरू असा प्रश्न देखील राखीने उपस्थित केला आहे.

राखीला जेंव्हा विचारण्यात आले की, तुम्ही आयपीएल पाहात आहेत का? त्यावेळी राखी म्हणाली की, इथे मुंबईत लोक मरत आहेत, आयुष्य थांबले आहे आणि इथे आयपीएल खेळले जात आहे वा…पुढे राखी म्हणाली की, इथे कोणीही नाही सर्वजन मुंबईच्या बाहेर सहलीला गेले आहे. तुम्हाला मी एकटीच मिळेल.राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत राखीच्या आजारी आईच्या वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या.

राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे. सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता.

या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.