सोशल मीडियावर राकेश टिकैत यांची ‘या’ कारणामुळे चर्चा; जाणून घ्या काय आहे कारण ?

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर मागच्या जवळपास तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. मात्र संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत हे या आंदोलनाचा खरा चेहरा बनले आहेत. शेतकरी नेते राकेश टीकेत हे शेतकरी आंदोलनानंतर प्रचंड चर्चेत आलेले नाव आहे. शेतकरी आंदोलनामुळे राकेश टिकैत यांच्या प्रसिद्धित वाढ झाली आहे.

राकेश टिकैत यांच्यामुळे शेतकरी आंदोलन उत्तर प्रदेश, पंजाब-हरियाणा, मध्य प्रदेशातून देशातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवले आहे. सोशल मिडियावरही राकेश टिकैत यांचे नाव खूप धुमाकूळ घालत आहे. मागील ३ महिन्यांत सोशल मिडियावर राकेश टिकैत यांच्या फॉलॉअर्समध्ये लाखोंची वाढ झाली आहे. राकेश टिकैत आता राकेश टिकैत वेगवेगळ्या राज्यात पंचायत करतील अशी चर्चा सुरु आहे.

राकेश टिकैत यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशभरातून राकेश टिकैत यांना पंचायतीसाठी बोलावले जाईल. टिकैत आता गाझीपूर बॉर्डरवर कमी दिसून येतात. राकेश टिकैत यांना पंचायतींच्या माध्यमातून शेतकरी चळवळ करायची आहे. टिकैत यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्यामुळे त्यांना याचा फायदा होणार आहे.

२७ आणि २८ जानेवारीच्या रात्री टिकैत यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंनी केवळ शेतकरी चळवळच मजबूत केली नाही तर त्यांच्या लोकप्रियतेवरही परिणाम झाला आहे. १० दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांचे ४ हजार फॉलोअर्स होते. परंतु काही दिवसांतच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या दीड लाखांपर्यंत वाढली आहे. तर त्यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट तीन कोटी लोकांनी पाहिली आहे. राकेश टिकैत आता मोठे शेतकरी नेते बनत आहेत. राकेश टिकैत यांची लोकप्रियता पाहून सहकाऱ्यांनी इंस्टाग्राम अकाउंट उघडले. या अकाउंटवर काही दिवसांतच ४५ हजार फॉलोअर्स झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.