“जोपर्यंत कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत माघार नाही,”राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्‌स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे. रस्त्यावर चक्‍क खिळे ठोकून तिथून कोणतेही वाहन ये-जा करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. रस्ते खणले जात आहेत, सीमांवर तारांचे पक्‍के कुंपण टाकून आंदोलकांना बाहेर पडता येणार नाही आणि तेथे कोणाला येताही येणार नाही, अशी व्यवस्था केली जात आहे.  यातच शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

 

भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,’जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, यासाठी आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. “असं राकेश टिकैत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे. 

दरम्यान,  सरकारने या भागात तारांचे कुंपण तसेच मोठमोठे बॅरिकेट उभे करून आंदोलकांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी तसेच राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात आता राहुल गांधी यांनीही यानिमीत्ताने उडी घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.