राज्यसभा अधिवेशनाचा प्रारंभ 20 जूनपासून

नवी दिल्ली: राज्यसभा अधिवेशनाचा प्रारंभ 20 जूनपासून होणार आहे. त्या अधिवेशनाची सांगता 26 जुलैला होईल. नव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा प्रारंभ 17 जूनपासून होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली जाईल. त्यानंतर 19 जूनला लोकसभेच्या नव्या सभापतींची निवड होईल. पुढच्या दिवशी म्हणजे 20 जूनला राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण होईल. अधिवेशनादरम्यान नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ नियमित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आणि इतर महत्वाच्या कामकाजामुळे अधिवेशनाचे महत्व वाढले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे ते पहिलेच अधिवेशन आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.