काश्‍मिरमधील 370 कलम घटनेतून हटवण्याची राज्यसभेत शिफारस

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अतिम शहा यांनी आज जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीवर राज्यसभेत निवदेन दिले. हे निवेदन देत असताना त्यांनी जम्मू काश्‍मीरमधील 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले आहे. त्यानुसार कलम 370 मधील काही कलमे वगळण्यात येणार आहेत, असे अमित शाह यांनी संसदेत सांगितलं आहे. जम्मू-काश्‍मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

अमित शहा यांनी राज्यसभेत निवेदन सादर केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जम्मू काश्‍मीरमध्ये अतिरिक्‍त सैन्य तैनात करण्यात आले आहेत. त्यावरून राज्यात काही तरी मोठे घडणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज अमित शहा यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.