शिरूर ( प्रतिनीधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मीडिया सेलच्या शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष पदी राजुद्दीन शहाबुद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मीडिया सेलचे अध्यक्ष प्रशांत प्रकाश पवार यांनी हि निवड केली असून या निवडीचे पत्र नुकतेच शिरूरचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी राजुद्दीन सय्यद यांना दिले आहे.
राजुद्दीन सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मीडिया सेलच्या शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात येत असल्याचे निवडीच्या पत्रात म्हटले आहे. आपण देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबुत व बळकट करावी.
राज्याचे खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या संगणक युगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिक रचनात्मक व संघटनात्मक करून पक्षाची ध्येय, धोरणे, विकासकामे गाव वाड्या, वस्त्यांवर पोहचवण्यासाठी आपण सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून संघटना मजबुत करणार असल्याचे राजुद्दिन सय्यद यांनी सांगितले.