आघाडी बाबत राजू शेट्टी म्हणाले…

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. तसेच आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. “एनडीए आणि भाजपला विरोध करण्याची आमची भूमिका कायम आहे. तसेच आता जी आघाडी होती ती लोकसभेची होती विधानसभेच काय करायचं हे आम्हला लवकरच राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन स्पष्ट करू, असे राजू शेट्टी म्हणाले.

तसेच सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा शेतमाल मुक्त नियमन करुन दाखवावं, ते सरकारचे मंत्री आहेत. दोन्हीकडे पाय ठेऊ नये, असे शेट्टी म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांची खासदारकीची हॅटट्रिक रोखत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान, पुण्यात बोलताना राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकांबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.