बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बारामतीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन अचानक भेट घेतली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला असल्याची चर्चा आहे.
राजू शेट्टी आणि शरद पवार यांच्यात जवळपास अडीच तास ही चर्चा सुरू होती. राजू शेट्टींना विधानपरिषदेचा प्रस्ताव मान्य असल्याचे देखील समजतंय. राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार असून राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तसेच विधान परिषदेची ऑफर देखील दिल्याचं सांगितलं होतं त्यानुसार आज राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि त्यांना विधानपरिषद प्रस्ताव मान्य असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.
त्याचप्रमाणे नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची माहिती घेतली. फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं.#Baramati @supriya_sule pic.twitter.com/9wHkM6A3PM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 16, 2020