कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे चक्क लोकसभेच्या रिंगणाततून थेट क्रिकेटच्या रिंगणात उतरल्याचे आज पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे या गावात प्रचारा दरम्यान राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळत षटकार लगावला.
राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघातून पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराचा भाग म्हणून ते सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यतील शाहूवाडी तालुक्यातील पेंडा खेळे इथं प्रचार करताना खासदार राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला तसंच स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे चिन्ह असलेल्या बॅटचाही त्यांनी प्रचार केला. राजू शेट्टी यांनी यावेळी गावकऱ्यांसोबत क्रिकेट खेळत षटकारही लगावले. राजू शेट्टी यांच्या क्रिकेटची चर्चा चांगलीच रंगली आहे.