मुश्रीफांच्या मालमत्तेवर छापेमारी प्रकरणी राजू शेट्टींनी केलं भाजपाला लक्ष

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यावर आता संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा सरकार वरती शरसंधान साधल्यावर आता माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे ईडी आणि इन्कम टॅक्स हे दोनच सच्चे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. जे लोक त्यांच्या पक्षांमध्ये येत नाहीत आणि जे लोक भाजपाला उपद्रव करतात…त्यांना उपद्रव देण हे काम ईडी आणि इन्कम टॅक्स च आहे. शिवाय ज्यावेळी आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री होते त्यावेळेस ईडी आणि इन्कम टॅक्स ने छापा का टाकला नाही ? आत्ताच छापा टाकावा का वाटला? असे प्रश्न उपस्थित करून हे न सुटणारे कोडे आहे अस शेट्टी म्हणालेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.