ट्रॅक्टर रॅली संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजू शेट्टी संतापले; म्हणाले,पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते

पोलिसांना आगाऊ माहिती देऊनच मोर्चा काढला होता मग गुन्हा दाखल करायचं कारणच काय ?

सतेज पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब थोरात यांच्यावर का गुन्हा दाखल नाही?
* काँग्रेस यामुळेच रसातळाला गेली; राजू शेट्टी यांची कोल्हापूरात टीका

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्राने केलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल काढलेल्या ट्रॅक्टर रॅली संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजू शेट्टी संतापले आहेत.

सांगली आणि कोल्हापूर पोलिसांना आगाऊ माहिती देऊनच मोर्चा काढला होता मग गुन्हा दाखल करायचं कारणच काय ?असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पोलिसांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते अस म्हणत सतेज पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब थोरात यांच्यावर का गुन्हा दाखल नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस यामुळेच रसातळाला गेली असा आरोप त्यांनी केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात ही टीका केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.